spot_img
spot_img

बुलढाण्यात जुन्या वादाची ठिणगी; भर लग्नात चाकूचे सपासप वार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आनंदाच्या वातावरणात रंगलेल्या लग्नसोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे घडली. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर भर पंगतीत तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत गौरव गजानन जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील शिंदे यांच्या मुलाच्या लग्नसमारंभात जेवण सुरू असताना गौरव जाधव यांचा नितीन सपकाळ याच्यासोबत जुना वाद पुन्हा चिघळला. कावड यात्रेदरम्यान झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. क्षणात संताप अनावर झालेल्या नितीन सपकाळ याने सोबत असलेल्या मयुरेश दसरकर याच्याकडील चाकू हिसकावून गौरववर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या गौरवला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!