spot_img
spot_img

परीक्षेला निघाला… पण मृत्यूने गाठलं! चिखलीत भीषण अपघाताने संताप

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) मालगणी फाटा येथे आज सकाळी सुमारे ९.०० वाजता झालेल्या भीषण अपघातात एकलारा येथील २१ वर्षीय शंतनू नारायण अंभोरे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. परीक्षा देण्यासाठी दुचाकीवरून बुलढाण्याकडे जात असताना भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने ही धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत पोलिसांना माहिती दिली. मात्र ट्रकच्या धडकेत तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. मालगणी फाटा परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!