spot_img
spot_img

केनवडजवळ दुर्दैवी अपघात; मोटरसायकल घसरून १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सहकारी गंभीर जखमी!

डोणगाव/केनवड (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) केनवडजवळ झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला असून मोटरसायकल घसरल्याने एका १९ वर्षीय होतकरू विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. धोडप बोडखे येथून आमखेडा (ता. मालेगाव) येथील कृषी महाविद्यालयाकडे जात असताना हा अपघात घडला.

या दुर्घटनेत संचित प्रल्हाद बकाल (वय १९) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. अपघातात जखमी झालेल्या त्याच्या सहकाऱ्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

संचित हा एकुलता एक मुलगा होता. तो केनवड येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवी खराटे व विमा प्रतिनिधी विनोद खराटे यांचा भाचा असल्याने नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. अवघ्या १९ व्या वर्षी एका होतकरू विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने धोडप बोडखे व केनवड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!