शेगाव (हॅलो बुलडाणा/ महेंद्र मिश्रा) नगरीत श्री संत गजानन महाराजांच्या 148 व्या प्रगटदिनानिमित्त भक्तांचा महासागर उसळला असून पहाटेपासून मंदिर परिसरात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. मंदिर प्रशासनाने 24 तास दर्शनाची व्यवस्था केली असली तरी मध्यरात्रीपासून रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना दर्शनासाठी तब्बल पाच तासांहून अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. मुखदर्शनासाठीही एक तासापेक्षा जास्त वेळ लागत असल्याने भाविकांची कसोटी लागली आहे.
तरीदेखील, लाखो भाविक अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने दर्शन घेत असल्याचे चित्र दिसत आहे. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून स्वयंसेवक भाविकांना मार्गदर्शन करत आहेत. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत मंदिर खुले राहणार असल्याने भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रगटदिनाच्या मुख्य दिवशी भक्तिभाव, शिस्त आणि उत्साह यांचा संगम शेगाव नगरीत अनुभवायला मिळत आहे.











Total Users : 3370396