spot_img
spot_img

२५० किमी सायकलिंगची कमाल; सुलतानपूरच्या डॉक्टरांनी दिला फिटनेसचा फॉर्म्युला!

सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/मोईन खान) संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधत सुलतानपूर येथील तीन तरुण डॉक्टरांनी आरोग्य जनजागृतीसाठी तब्बल २५० किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करत व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश दिला. डॉ. शशिराज लाहोटी, डॉ. अमोल बोराळकर आणि डॉ.भागवत जाधव यांनी सुलतानपूर ते शेगाव आणि परत असा खडतर प्रवास करत निरोगी राहा, व्यसनांना दूर ठेवा हा सामाजिक संदेश दिला. व्यस्त वैद्यकीय सेवेतून वेळ काढत ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता त्यांनी प्रवासाला सुरुवात केली आणि ४ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता सुरक्षितपणे सुलतानपूरला परतले.

या उपक्रमामागे केवळ साहस नव्हे, तर नियमित व्यायाम, सायकलिंग आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार हा मुख्य हेतू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुलतानपूरमध्ये परतताच डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन आणि मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी सागर पनाड, प्रा. आनंद झोरे, डॉ. राजेश जुमडे, शे. लतीफ, शेर खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. व्यायाम शरीराला बळ देतो, तर व्यसनमुक्ती आयुष्याला दिशा देते, असा संदेश डॉ. लाहोटी यांनी दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!