सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/मोईन खान)
येथील रहिवासी सुभान मुसा शेख आणि त्यांच्या पत्नी पवित्र उमरा यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्का व मदिना येथे रवाना झाले आहेत. त्यांच्या या प्रवासाच्या निमित्ताने सुलतानपूर परिसरात अत्यंत भावूक आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यात्रेला निघण्यापूर्वी आयोजित निरोप समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शेख दाम्पत्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला आणि त्यांच्या सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेमामुळे मन भारावून गेले असून, सर्वांच्या कल्याणासाठी आपण प्रार्थना करू, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात सकारात्मक आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते.












