spot_img
spot_img

चिखलीत संत नरहरी महाराज पुण्यतिथीला भक्तीचा जल्लोष; सुवर्णकार समाजाची नवी कार्यकारिणी जाहीर

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) सोनार समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७४० व्या पुण्यतिथीनिमित्त चिखलीतील सोनार समाज मंदिर भक्ती, उत्साह आणि एकतेच्या घोषणांनी अक्षरशः दुमदुमून गेले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात समाज बांधवांची उसळलेली गर्दी लक्षवेधी ठरली. अनिकेत लोळगे व सौ. अनुराधा लोळगे यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीपप्रज्वलन, पुष्पहार अर्पण आणि सामूहिक महाआरतीदरम्यान नरहरी सोनार महाराज की जय च्या जयघोषाने परिसर भारावून गेला.

या मंगल प्रसंगी चिखली सुवर्णकार समाजाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी भिकू लोळगे, उपाध्यक्षपदी दीपक काळे, सचिव सुनील डहाळे, कोषाध्यक्ष संतोष डहाळे व सहसचिव समीर दहिवाळ यांच्यासह सदस्यांची निवड झाली. नव्या पदाधिकाऱ्यांनी समाजहिताचे उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करताच उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नवयुवकांनी घेतलेली धडाडीची जबाबदारी आणि शिस्तबद्ध नियोजन विशेष कौतुकास्पद ठरले. पुरुष, महिला व युवकांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!