spot_img
spot_img

बुलढाण्यात सोनार समाजाची ताकद दिसली; संत नरहरी सोनार पुण्यतिथीला रक्तदानाचा महासंदेश!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) संत नरहरी सोनार यांच्या 740 व्या पुण्यतिथीनिमित्त बुलढाण्यात सोनार समाजाची उल्लेखनीय एकजूट पाहायला मिळाली. धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजसेवेचा ठसा उमटवत ‘रक्तदान  जीवनदान’ उपक्रम राबवण्यात आला आणि समाजाने केवळ उत्सव नव्हे तर जबाबदारीही निभावल्याचे चित्र दिसून आले. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या समाजबांधवांनी एकीचे शक्तिप्रदर्शन करत सामाजिक कार्याचा ठाम संदेश दिला.

समाज मंडळाचे अध्यक्ष श्रीराम उज्जेनकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप तारपुरे, निलेशभाऊ रत्नपारखी, प्रदीप अर्धापूरकर, रविकुमार घुसळकर, मनोज खंदारकर, अमोल कऱ्हे, विजय उज्जेनकर, नरेश उज्जेनकर, सुनील तळेकर, गिरीश उज्जेनकर, संजय तळेकर, आनंद सोनार, संजय वायाळकर आदींच्या पुढाकाराने कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडला.

रक्तदानासाठी युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली, तर दुर्मिळ रक्तगट असलेल्या व्यक्तींनी भविष्यासाठी नोंदणी करून समाजकार्याची तयारी दाखवली. समाजाचा प्रत्येक थेंब कोणाच्यातरी जीवनासाठी अमूल्य ठरू शकतो, असा ठाम संदेश आयोजकांनी दिला. आगामी काळात जयंती-पुण्यतिथीला केवळ औपचारिकता न ठेवता अधिक व्यापक सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!