नांदुरा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील एका गावात लग्नसंस्थेलाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून, नवविवाहितेवर तिच्याच सासऱ्याने घरात कोणी नसताना विनयभंग केल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पीडितेचे लग्न एप्रिल २०२५ मध्ये झाले होते. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत असल्याचे भासवले गेले. मात्र, त्यानंतर घरातील वरिष्ठ व्यक्तीनेच संधी साधत पीडितेच्या खोलीत प्रवेश करून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. विरोध केल्यावर तिला गंभीर परिणामांची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे पीडित मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली असून तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. घरात सुरक्षित असल्याचा विश्वासच जर मोडीत निघत असेल, तर महिलांनी जायचे तरी कुठे? अशा घटनांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून दोषींना कठोर शिक्षा मिळावी, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










