spot_img
spot_img

💥EXCLUSIVE ‘₹20 हजार द्या, ₹2 लाख घ्या’- खोट्या स्वप्नांची फॅक्टरी बंद! १५ वर्षीय युट्युबरला गंडवण्याचा प्रयत्न; मलकापुर पोलिसांनी ‘चिल्ड्रन बँक’ टोळी पकडली!

मलकापुर (हॅलो बुलडाणा) सोशल मीडियावर ‘₹20 हजार द्या, ₹2 लाख मिळवा’ अशा भुलथापा देत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तथाकथित ‘चिल्ड्रन बँक’ टोळीचा मलकापुर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न थेट एका १५ वर्षीय युट्युबरवर करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास मलकापुर बसस्टँड परिसरात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि दीपक वारे, पोशि आसीफ शेख, पोशि सुरज चौधरी पेट्रोलिंग करीत असताना संशयास्पद स्थितीत फिरणारा एक अल्पवयीन मुलगा आढळून आला. चौकशीत त्याने स्वतःचे नाव यश मदनलाल गढरीया (वय 15, रा. दिल्ली) असल्याचे सांगितले.

इंस्टाग्रामवरील एका रीलद्वारे ₹20 हजारांच्या बदल्यात ₹2 लाख देण्याचे आमिष दाखवण्यात आले असून, त्या रीलमधील मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधल्यानंतर मलकापुरात येण्यास सांगण्यात आल्याची धक्कादायक माहिती त्याने दिली. युट्युबर असल्याने हा प्रकार उघड करण्याच्या उद्देशाने तो मलकापुरात आला होता.

पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार सापळा रचण्यात आला. बसस्टँड मागील गल्लीत तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन युवकांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आनंद संतोष इंगळे (वय 23) व रोहित रतन महाले (वय 22, दोन्ही रा. भिमनगर, मलकापुर) अशी आहेत.

चौकशीत आरोपींनी ₹20 हजार घेऊन ‘चिल्ड्रन बँक’चे ₹2 लाख देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 318(2), 62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!