spot_img
spot_img

दुपारी शेतात गेले…रात्री विहिरीत सापडले; शिक्षकाचा मृत्यू

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील हराळखेड येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद वैरागड शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक श्रीकिशन भगवान येवले (वय 53) यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काल दि. 01 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 3 वाजता श्रीकिशन येवले शेतात गेले होते. संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधमोहीम राबवली. अखेर रात्री सुमारे 2 वाजता त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शिक्षकवर्गात शोककळा पसरली आहे. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास ASI दिलीप तोंडे (अमडापूर पोलीस) करीत आहेत. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!