डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) रिसोडच्या तहसीलदार प्रतिक्षाताई तेजनकर यांना स्व. चतुराबाई स. पळसकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘राजमाता माँ जिजाऊ पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल, डोणगाव पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
शनिवार, १ फेब्रुवारी रोजी तहसीलदार प्रतिक्षाताई तेजनकर व रिसोडचे ठाणेदार संतोष अघाव हे डोणगाव दौऱ्यावर आले असता, पत्रकार संघाने त्यांचे उत्साहात स्वागत केले. प्रशासकीय कामकाजात दाखवलेली तत्परता, लोकाभिमुख निर्णय आणि जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, यामुळे सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
या सत्कार प्रसंगी डोणगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे, उपाध्यक्ष ॲड. जैनुल आबेद्दीन शेख, सचिव सुबोध आखाडे, मार्गदर्शक अशोकराव वानखेडे यांच्यासह सदस्य जमील पठाण, आवेज पठाण, अनिल राठोड, गणेश लहाने, राजेश वाघमारे, सुरेश फिसके, देविदास खनपटे उपस्थित होते. तसेच माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर, ‘सकाळ’चे बातमीदार राम लहाने व इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 3557914