अमडापूर (हॅलो बुलडाणा) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा केंद्रीय बँकेच्या उदयनगर शाखेचे शाखा व्यवस्थापक स्व. विजय माधव आराख रा. सावित्रीबाई फुले नगर परिसर बुलढाणा यांचा दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी एका भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. उदयनगर परिसरातील डासाळा गावाजवळ हा भीषण अपघात घडला. स्व. आराख हे दुचाकीवरून बुलढाण्याकडे येत असताना वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या वाहनाने याच ठिकाणी आणखी दोन जणांना उडवल्याची प्राथमिक माहिती असून,परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अमडापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित ट्रक ताब्यात घेतल्याची माहिती आहे. निष्काळजी व वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
■ दिलगिरी ■
बातमी सूत्रानुसार प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर अपघातात ‘ट्रक’ असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र सदर अपघात हा ‘अज्ञात वाहनामुळे’ झाल्याचे कळते.या संदर्भात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल ‘हॅलो बुलढाणा’ दिलगिरी व्यक्त करत आहे.











