बुलढाणा (हॅलो बुलडाणा) रायपूर येथे वाळू माफियांनी पुन्हा एकदा कायद्याला खुलेआम आव्हान दिले असून, अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना थेट महिला तलाठ्याच्या जीवावर उठण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महसूल यंत्रणेत संतापाची लाट उसळली आहे.
रायपूर येथील तलाठी उषा देशमुख या तलाठी कार्यालयासमोर कर्तव्य बजावत असताना गावातील ज्ञानेश्वर मुरडकर हा व्यक्ती नंबर प्लेट काढलेल्या ट्रॅक्टरमधून बिनधास्तपणे अवैध रेती वाहतूक करत होता. कायद्याची अंमलबजावणी करत उषा देशमुख यांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कारवाई टाळण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपीने थेट महिला तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली या प्रकरणी ट्रॅक्टर मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे वाळू माफियांना कोणाचे पाठबळ? असा थेट सवाल उपस्थित झाला असून, महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कठोर कारवाई न झाल्यास वाळू माफियांची दहशत अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.










