मेहकर (हॅलो बुलडाणा) “जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत,” या प्रेरणादायी विचारांच्या साक्षीने मेहकर शहरात भव्य धार्मिक-सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र भूषण, संतदासानुदास ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या जाहीर हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता नगर परिषद मैदान, मेहकर येथे संपन्न होणार आहे. समाजप्रबोधन, अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीचा त्रिवेणी संगम असलेले इंदोरीकर महाराजांचे हरिकीर्तन ऐकण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना, युवसेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, मेहकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी लोकप्रिय नगराध्यक्ष किशोर भास्करराव गारोळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.या भव्य हरिकीर्तन सोहळ्यासाठी मेहकर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.












Total Users : 3370551