spot_img
spot_img

पळसखेड दौलत शिवारात तरुणाची फाशी घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील पळसखेड दौलत शिवारात दुपारी सुमारे २ वाजण्याच्या दरम्यान एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रविन जगदेव जाधव (वय २९), राहणार पळसखेड दौलत, यांनी शेतात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शांता मगर पुढील तपास करीत आहेत. तरुण वयात घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!