भादोला (हॅलो बुलडाणा) आज भादोला येथे एसीपीडीएफआर रिटायर फौजी नारायण लक्ष्मण सोनुने यांच्या वाढदिवसानिमित्त एक प्रेरणादायी आणि समाजाला आरसा दाखवणारा कार्यक्रम पार पडला. केवळ केक कापून, दिखाऊ शुभेच्छांवर समाधान न मानता सोनुने कुटुंबाने थेट गरजूंच्या पोटाशी नातं जोडत भादोल्यातील गरजू व्यक्तींना जीवनावश्यक राशनचे वाटप केले. या उपक्रमाचे विशेष म्हणजे हा सेवाभावी कार्यकम त्यांच्या मातोश्री गंगुबाई लक्ष्मण सोनुने यांच्या शुभहस्ते पार पडला, ज्यामुळे कार्यक्रमाला भावनिक आणि सामाजिक वजन प्राप्त झाले.
या वेळी गावातील मित्रमंडळींसह विविध क्षेत्रातील वरिष्ठ, मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेतील शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत नारायण सोनुने यांनी वाढदिवसाला समाजसेवेचे सुंदर स्वरूप दिले.











Total Users : 3292471