चिखली (हॅलो बुलडाणा) नगरपरिषद निवडणुक भाजपा अधिकृत उमेदवार पंडितराव देशमुख यांच्या प्रचारार्थ वातावरण तापवत महाराष्ट्रराज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले भाषण क्षणोक्षणी टाळ्यांच्या गजरात चिखली शहर दणाणून गेले.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार महाले म्हणाले, ज्याला भाजपने भ्रष्टाचाराच्या प्रचंड कृत्यांमुळे पक्षातून हाकलले, त्या माजी नगराध्यक्षाला काँग्रेसने उमेदवार म्हणून उभे केले… हा भ्रष्टाचाराला काँग्रेसचा ‘सन्मानपत्र’ आहे का?काँग्रेसचा हा निर्णय म्हणजे जनतेचा, शहराच्या विकासाचा आणि प्रशासनाच्या स्वच्छतेचा सरळ अवमान असल्याचा आरोप आमदार महाले यांनी केला. त्यांनी स्पष्ट सांगितले की,हा माजी नगराध्यक्ष मूळचा काँग्रेसमधूनच आला होता, तरीही कुठलेही राजकारण न करता भाजपने त्याचे काम प्रामाणिक पणाने केले. पण याच व्यक्तीने नगरपालिकेत बसून केलेला भ्रष्टाचार एवढा मोठा होता की आम्ही त्याला पक्षातून हाकलण्याशिवाय पर्याय उरला नव्हता, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये हजारोंच्या संख्येत उपस्थित नागरिकांनी घोषणांनी वातावरण पेटवले.फडणवीसांच्या या फायरब्रँड भाषणामुळे चिखलीतील निवडणूक तापमान आणखी वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली असून, यानंतर भाजपची मोहीम आणखी वेग घेण्याची शक्यता आहे.














