चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली नगरपरिषद निवडणुकीत भाजपने आज निर्णायक दणका देण्याची तयारी केली असून उद्या दुपारी होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा प्रचंड राजकीय हलचल निर्माण करणार आहे. भाजप उमेदवार पंडित दादा देशमुख यांच्या समर्थनार्थ मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता राजा टॉवर येथे होणारी ही सभा केवळ प्रचारसभा नसून राजकीय शक्तिप्रदर्शनाचा महाअत्युच्च बिंदू ठरणार आहे.
चिखली विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पंडितराव देशमुख यांच्या केंद्रस्थानी होणारी ही सभा प्रतिस्पर्ध्यांच्या समीकरणांची वाटच उध्वस्त करणारी ठरेल, अशी राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू आहे. नगरपरिषद निवडणुकीत आधीच भाजप आक्रमक मोडमध्ये असून फडणवीस यांच्या आगमनाने हा आक्रमकपणा प्रचंड लाटेत परिवर्तित होईल, अशी पक्षकार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त ऊर्मी उसळलेली आहे.














