बुलढाणा (हॅलो बुलढाणा) निर्माते, दिग्दर्शक मुळशी पॅटर्न, देऊळ बंद, धर्मवीर १,२ , या चित्रपटाची निर्माते दिग्दर्शक प्रसिद्ध चित्रपट अभिनेते प्रवीण तरडे यांची मेहकर असणाऱ्या गोमेधर येथील माऊली हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट येथे भेट देऊन मिरची भाजी व बाफळे यांचा मनमुरादपणे जेवणाचा आस्वाद घेतला.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक यांनी धर्मवीर १,२ या दोन्ही चित्रपटांची निर्मिती केली त्याचबरोबर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे मुळशी पॅटर्न ,देऊळ बंद सारखे चित्रपट महाराष्ट्राला देणारे मराठी भाषेचा स्वाभिमान असलेले महाराष्ट्रातील नामवंत दिग्दर्शक निर्माता व साधी राहणीमान असणारे प्रवीण तरडे सर यांनी व आपले सहकारी मित्र महेश हगवणे, श्रीपाद चव्हाण, अभिजीत भोसले, यांच्यासह गुरुवार निमित्त श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परत येत असताना संगम फाटा गोमेधर येथील माऊली हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट ला भेट दिली. हॉटेलची प्रसिद्ध मिरची भाजी व बाफळे यांचा मनमुरादपणे आस्वाद घेतला. पोट भरून सहकाऱ्यांनी जेवणाचा आस्वाद घेऊन शेगाव भेटीदरम्यान नेहमीसाठी माऊली हॉटेल ला भेटत राहू असल्याचे सांगितले.दरम्यान त्यांनी चित्रपटातील संवाद एककविले.. “यमदेव जरी रेड्यावर बसून आला नाई.. तरी आपण थाट्टात उभं राहायचं..”
“आपल्याकडे ना साहेब, जेवणं गरिबांचं होतं, पण पिणं गरिबांचं होतं आणि आपलं हे रक्ताचं होतं..!”
“हे बघं, माझं ऐक, हे जे काही आहे ना, ते माझं स्वप्न आहे.”














