spot_img
spot_img

विशेष! खंडणीखोर पत्रकारांना पाठबळ कोणाचे? – पत्रकारितेतील झूल पांघरून दिवसा ढवळ्या दरोडेखोरी करणाऱ्या बांडगुळांवर अंकुश लावण्याची गरज!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अवैध धंदे, गुन्हेगारी वृत्ती, भ्रष्ट व्यवस्था यांच्याविरुद्ध लढणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार असतोय.. आज तोच हरवला आहे. ही त्याची झाली एक बाजू…काही चांगलेही पत्रकार आहेत, ते त्यांचं कर्तव्य अगदी तंतोतंत,निःस्वार्थ, वंचितांना न्याय देण्यासाठी, जीवाची पर्वा न करता करत असतात. त्याचं पाऊल जनतेच्या हितासाठीच असते..असे पत्रकार वगळता काही लोचट प्रवृत्तीचे लोक त्यामध्ये मिसळले आहेत. या तोतयांनी हल्ली तर सोशल मीडियाच्या यू टयूब चैनल आधारे पत्रकार असल्याचेअखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने तक्रार दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात बनावट पत्रक सादर केले जात असल्याने वास्तविक पत्रकारिता करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे.जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, मलकापूर, शेगाव , नांदुरा, जळगाव जामोद तालुक्यात बनावट सार्धम्य असलेली वृत्तपत्र डिजिटल माध्यमांवर आढळून आली. ‘लोकतंत्र’ असे त्याचे नाव आहे. शासनाची याला कुठलीच परवानगी नसतांना ते वाहनांवर देखील प्रेस लिहून भरधाव वाहन दमटतात.या शिवाय जिल्ह्यात इतरही तोतया पत्रकार दिवाळी जाहिरातीसाठी अनेक कार्यालयात फिरताना दिसून येतात.भासवित गंडविण्याचा प्रकार सुरु केला आहे. त्यामुळे पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात येण्याची मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राजू घाटे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.शहरात, गावांत,

आणि मनामनांत गस्त घालणारे दैनिक शिक्षण असणाऱ्यांना पत्रकारितेची झूल पांघरुण उजळमाथ्याने एखाद्याला निशाणा करुन राजरोसपणे दरोडेखोरी चालवली असून काही ठिकाणी यांच्या ‘टोळ्याच’ निर्माण झालेल्या
आहेत.दिवसागणिक वेगवेगळ्या नावाने अनेक चॅनेल्स येत आहेत.काहींनी तर वेबपोर्टल काही हजारांत तयार करुन देण्याचा धंदा मांडला असून या दरोडेखोरांना कायदेशीर स्वरुप देत आहेत. पत्रकारितेत परंपरेने घालून दिलेली काही तत्त्वं आहेत, या तत्त्वांच्या चौकटीमध्ये काम करणं ही खरंच तारेवरची कसरत आहे, ऐवढे सुर्यसत्य!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!