spot_img
spot_img

जिल्हा बँकेचे सीईओ डॉ. अशोक खरात यांना मुदतवाढ!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे सीईओ डॉ. अशोकराव खरात यांच्या नियोजन व अथक प्रयत्नांतून डबघाईस आलेली जिल्हा केंद्रीय सहकारी बँक पूर्व पदावर येत आहे. बँकेला गत वैभव प्राप्त करून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुख्याधिकारी डॉ. अशोकराव खरात यांना शासनाकडून मुख्याधिकारीपदी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. २०२८ पर्यंत ते आता बँकेचा कारभार पाहतील.

जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही तळागाळातील आणि गोरगरीब व शेतकरी वर्गाला पतपुरवठा करणारी बँक मानली जाते. मधल्या काळात बँक डबघाईस आल्याने बँकेचे व्यवहार देखील ठप्प झाले होते. बँकेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना अथक प्रयत्न व योग्य नियोजन करून डॉ. अशोकराव खरात यांनी बँक पूर्व पदावर आणण्याचे मोठे प्रयत्न सुरू ठेवले. त्याला चांगले यश आले आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँक पुन्हा नव्याने उभारी घेत आहे. बँकेचे आर्थिक व्यवहार पूर्वपदावर आले आहे. याची दखल घेत रिझर्व बँकेने त्यांना ३१ मार्च २०२८ पर्यंत मुदत वाढीस मंजुरात दिली आहे. त्यांना मुदत वाढ दिल्याबद्दल जिल्हा बँकेचे कर्मचारी, सहकार क्षेत्रातून त्यांचे स्वागत होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!