जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) भाजप कार्यकर्ते तथा शासकीय कंत्राटदार स्व. पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूची सीआयडी चौकशी करण्यात यावी, यासाठी सर्वपक्षीय सभा पार पडली.
गेल्या महिन्या भरापूर्वी भाजपा कार्यकर्ते पंकज देशमुख यांचा संशयास्पद मृत्यु झाला. परंतु मृत्यु नंतर एक महीना उलटून सुद्धा त्या प्रकरणी कुठलीही ठोस कार्यवाही जळगाव जामोद पोलिस स्टेशन मार्फ़त झाली नाही. मृत्यु झालेल्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी पाहिल्या नुसार जनतेत ही आत्महत्या नसून घातपात असल्याची कुजबुज मोठ्या प्रमाणावर चालू होती. महीना होवून सुद्धा तपास योग्य दिशेने जात नाही हे पाहुन स्व. देशमुख यांच्या पत्नीनी मीडिया समोर येऊन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून माझ्या पतीची हत्या असल्याचा आरोप करुन पोलिस प्रशासनावर विश्वास नसल्याने ही चौकशी सीआयडी मार्फ़त करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल यांनी कुटुंबाची भेट घेऊन स्व. पंकज देशमुख यांच्या पत्नीने केलेल्या मागणीला पाठिंबा देत पत्रकार परिषदे मध्ये सीआयडी चौकशीची मागणी केली. त्याच पृष्ठभूमीवर देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी 7 जुन रोजी सर्व पक्ष, सामाजिक संघटना यांची जळगाव जामोद कृषि उत्पन्न बाजार समिती येथे सद्भावना न्याय सभेचे आयोजन करण्यात आले होते. देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व सोबत असल्याच्या भावना यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केल्या. या मृत्यु प्रकरणात जळगाव पोलिस मार्फ़त सुरु असलेली कार्यवाही संशयास्पद असुन ही चौकशी सीआयडी मार्फ़तच व्हायला यासाठी येत्या सोमवारी दिनांक 9 जुन रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फ़त गृहमंत्री यांना निवेदन देण्याचे तसेच न्याय मिळवून देण्यासाठी लोकलढा उभारण्याचे एकमताने ठरविण्यात आले. यावेळी श्रीमती सुनीता पंकज देशमुख, राष्ट्रवादीचे प्रसेनजीत पाटिल,सौ. स्वाती वाकेकर, सचिन देशमुख, प्रकाश पाटिल, रंगराव देशमुख,दत्तात्रय पाटिल, विश्वास भालेराव,भिमराव पाटिल, गजानन वाघ,प्रमोद सपकाळ, अविनाश उमरकर, विजय पोहनकार, भाऊराव भालेराव,अभय मारोडे, अजय पारस्कार,तुकाराम काळपांडे, प्रकाश वाघ,सुनिल बोदडे प्रवीण भोपळे, अमर पाचपोर,सौ. वर्षा वाघ,ईरफान खान,रमेश ताडे, अजहर देशमुख,प्रशांत अवसरमोल, सैय्यद नफिज,अब्दुल जहिर, दत्ता डिवरे, यांच्या सह शेकडो लोक उपस्थित होते.
▪️मलकापूर एसडीओं कडे चौकशीचे आदेश!
अनंता मधुकरराव देशमुख रा. निमगाव ता.नांदुरा यांनी 3 मे रोजी जळगाव जामोद येथे सदर प्रकरणी तक्रार दिली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक यांनी 4 जून रोजी तातडीने अकस्मात मृत्यूची पुढील चौकशी करण्यासाठी मलकापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आदेशित केले व अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांना याप्रकरणी लक्ष देऊन स्वतः पर्यवेक्षण करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.












Total Users : 3427591