spot_img
spot_img

ड्राय डे ला हॉटेल छत्रपतीत दारू विक्री! – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची धडक कारवाई!

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) ड्राय डे म्हणजे दारू विक्रीला चक्क बंदीचा दिवस, पण चिखली तालुक्यातील साकेगाव रोडवरील हॉटेल छत्रपतीला मात्र नियमांचं काही घेणं-देणं नसल्याचं उघड झालं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या हॉटेलवर धडक कारवाई करत तब्बल ४,८५० रुपयांची देशी व विदेशी दारू विक्री होत असल्याचा पर्दाफाश केला आहे.

छापा टाकतानाच हॉटेलमध्ये दारू विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अनिरुद्ध विठोबा टापरे या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तपास अधिकारी एस. के. पाटील आणि आर. एच. सौभागे यांनी नियोजनबद्ध कारवाई केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!