spot_img
spot_img

💥धूम! विधी संघर्षीत बालकाने 5 दुचाकी चोरल्या! – एलसीबीने घेतले त्याला ताब्यात!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे जिल्ह्यात चिंताजनक चित्र आहे.शेगाव संत नगरीतून 5 दूचाक्या एका विधी संघर्षीत बालकाने चोरल्याचे समोर आले असून, दोन लाख 90 हजार रुपयांच्या दुचाकी एलसीबी पथकाने जप्त केल्या आहेत.

शेगाव शहर पोलीस ठाण्यात एक दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्यावरून एलसीबी पथकाने तपास सुरू केला. यामध्ये एक विधी संघर्षीत बालक निष्पन्न झाला. हा बालक नांदूरा येथील आहे. त्याच्याकडून 6 जून रोजी जवळपास 2 लाख 90 हजार रुपये किंमतीच्या 5 दुचाक्या जप्त करण्यात आल्या. शेगाव शहर 3 व भुसावळ 2 अशा 5 गुन्ह्याची उकल करण्यात आली. या गुन्ह्यांमध्ये आणखी कोणी आरोपी आहेत का? याचा तपास करण्यात येत आहे.गुन्हे करण्याची पद्धत अशी होती की, दुकान, बिअर बार,बस स्थानक, मंदिर परिसर,अन्य सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बाईक हेरून हा बाल गुन्हेगार दूचाक्या चोरत होता व धूम ठोकत होता. दरम्यान एसपी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!