चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील युवकांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस भीषण वाढ होत आहे. आज दुपारी 3 च्या सुमारास पिंपळगाव सराई चिखली रोडवरील आंब्याच्या झाडाला कमरेच्या पट्याने गळफास घेऊन 19 वर्षीय युवक राजिक खा इस्माईल खा (रा. सैलानी नगर, चिखली) याने आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना पाहून परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.राजिक खा याने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चिखली तालुक्यात आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शिक्षण, बेरोजगारी, मानसिक तणाव, कौटुंबिक कलह यासारख्या समस्यांमुळे युवक नैराश्यात जात असून शासन आणि प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. प्रत्येक आत्महत्या ही समाजासाठी इशारा असून तरीही प्रशासन केवळ आकडे मोजण्यात व्यस्त आहे.
आत्महत्यांचा हा सुळसुळाट थांबवायचा असेल तर शासनाने तातडीने युवकांसाठी समुपदेशन केंद्रे, रोजगार हमी योजना आणि मानसिक आरोग्य सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.










Total Users : 3269162