बुलढाणा (हॅलो बुलडाणा) एसपी पदावरून जिल्हा पोलीस दलात महानाट्य सुरू आहे.बदली झालेल्या आणि त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या अशा दोन एसपी मध्ये आता थोड्या वेळापूर्वी एसपी कार्यालयात तणावाचे चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे अधिकृत एसपी कोण?हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आधीचे जिल्हा पोलीस अधीक्षक
विश्व पानसरे यांची गृह विभागाने बदली केली.त्यांनी कॅट मध्ये धाव घेतली आणि कॅटने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली.दरम्यान त्यांनी आजारी रजा घेतली होती.त्यांच्या जागी निलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी पदभार स्वीकारला आहे.दरम्यान आज दोन्ही एसपी कार्यालयात पोहचले परंतु बुलढाणा जिल्ह्याचे एसपी कोण हा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे.मुख्य खुर्चीवर विश्व पानसरे बसले होते.यावेळी काहीशी तणावाची परिस्थिती दिसून आली.या घडामोडीवर ‘हॅलो बुलढाणा’ पूर्णता लक्ष ठेवून आहे.