spot_img
spot_img

💥EXCLUSIVE “आतंकवाद्यांनी भारतीयांच्या नादी लागू नये!” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डागली तोफ!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) पाकिस्तानला चोख जबाब देण्याचे काम भारतीय सैनिक करत आहे. ‘गोली का जवाब तोफ गोले से देंगे’ हा नवभारत आहे. ‘आतंकवाद्यांनी भारतीयांच्या नादी लागू नये’ हे भारतीय लष्कराने दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बुलडाणा येथे केले.

बुलडाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा 10 मे ते 18 मे पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभुमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या वाणीतून शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा धकधकता इतिहस कथण केल्या जात आहे. या कार्यक्रमा दरम्यान गिता परिवार संस्थेच्यावतीने निलेश महाराज झरेकरे यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार हा गोविंद देवगिरी महाराज,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर आमादर संजय गायकवाड,श्रेता महाले,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, ओमसिंग राजपूत, युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव तथा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के उपस्थित होते. ना.एकनाथ शिंदे पुढे म्हणले की, अडचणीत सापडल्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी समाज पंढरीचा कार्यकर्ता आहे. सत्ता पंढरीचा नाही. यापुढेही मी समाजाच्या प्रत्येक कामासाठी सदैव तयार राहील. आम्ही टीम म्हणून काम करत आहोत आणि यापुढे करत राहणार. लाडकी बहिणी, लाडके भाऊ आणि लाडक्या शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केले त्यामुळे आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो. लडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले. धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान हे राजकीय अधिष्ठानापेक्षा मोठे आहे,असेही ते म्हणाले. देशाच्या लष्कराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार हे तुमचं आमचं कर्तव्य आहे.देशाचे खंबीर नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम येथे आपल्या बहिणीचं कंकु पुसणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणले की, संतांचा वारसा समाज प्रबोधनाचे काम वारकरी संप्रदाय करत आला आहे. त्यामुळेच आपण या संत परंपरेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येथे आल्याचे ना.शिंदे यांनी यावेळी सांगितले.दरम्यान
राज्यातील 47 हजार बंदीवाद्यांना भगवद्गीतेच्या माध्यमातून सुधारण्याचं काम केल्या बद्दल निलेश महाराज झरेकर यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!