spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – शेतकऱ्यांचा आधारवड: आ.खरात साहेबांची ‘फॉर्च्यूनर लीजेंडर’ मेहकरच्या सेवेत सज्ज!

मेहकर (हॅलो बुलडाणा) लोणार-मेहकर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांची लढाई अधिक सक्षमपणे लढण्यासाठी आ. खरात साहेबांनी एकादशीच्या पवित्र पर्वावर नव्या ‘फॉर्च्यूनर लीजेंडर’चा ताफा खरेदी केला आहे. ही केवळ एक गाडी नसून, मेहकर मतदारसंघातील सामान्य माणसाचा न्याय देणारी ‘हक्काची गाडी’ ठरणार आहे.गावखेड्यातून मंत्रालयापर्यंत मजल मारून मोठा साहेब बनलेल्या आणि आमदारकीची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या आ.खरात साहेबांचे मेहकरच्या जनतेला अभिमान आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांची लढाऊ भूमिका आजवर संपूर्ण जिल्ह्याने अनुभवली आहे. त्यांच्यासोबत युवानेते किशोर गारोळे, आशिष राहटे, एडवोकेट आकाश घोडे, निंबाजी पांडव, एडवोकेट संदीप गवई आणि इतर कट्टर साथीदारांचा भक्कम पाठिंबा आहेच.

आ. खरात साहेबांची ‘फॉर्च्यूनर लीजेंडर’ आता ग्रामीण भागातील प्रत्येक तक्रारीला न्याय देण्यासाठी सज्ज आहे. सामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारी, शेतकऱ्यांच्या समस्या थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवणारी आणि प्रत्येकाच्या हक्काची लढाई सक्षमपणे लढणारी ही गाडी आता मेहकर मतदारसंघातील लोकांचे नवसंजीवनी ठरणार आहे. “यात तीळमात्र शंका नाही!”

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!