बुलढाणा (हॅलो बुलडाणा) उन्हाळ्याची तीव्रता दिवसागणिक वाढत चालली आहे. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पक्षी व वन्य प्राण्यांना तीव्र तृष्णातृप्तीचा सामना करावा लागत आहे.मात्र या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास कोणी तयार दिसत नाही. परंतु काही प्राणीप्रेमींची भुतदया प्रशंसनिय ठरतेय! असेच बुलढाण्यातील वर्धमान चव्हाण मामा हे मलकापूर रोडवरील संकट मोचन मंदिर परिसरात वन्य प्राण्यांची तहान भागविणारे अवलिया ठरले आहेत.
खळखळणारे नदी नाले, पाण्याने तुडूंब भरलेले डोह, किलबिल करणारे पक्षी, अशा वृक्षवल्ली मध्ये वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असे दृश्य आता जंगल परिसरामध्ये पाहिला मिळत नाही. कारण निसर्गातील जीवन म्हणून ओळखला जाणारा अत्यंत महत्त्वाचा पाणी नावाचा घटक असल्याने जंगलात पाण्यासाठी जणू काही लॉकडाऊन सुरू असल्याचे चित्र अनुभवास येत आहे.
उन्हाळ्यात वन विभागाकडून वन्य प्राण्याचे पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दृष्य आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढला असून वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती पाहता वन विभागाने पानवठ्यात पाणी सोडावे अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे. अशात
प्राणीमात्रांवर दया करा हे आपण नेहमीच एकतो. मात्र प्रत्यक्षात मदत करणारे थोडेच असतात. परंतु बुलढाण्यातील 65 वर्षाचे वर्धमान चव्हाण हे 4 ते 5 कॅन संकट मोचन हनुमान मंदिर येथे छोट्या सिमेंटी पाणवठ्यात सकाळी 7 ते 8 वाजता पाणी उपलब्ध करून देतात.स्वखर्चाने पाणी उपलब्ध करून देणारे वर्धमान चव्हाण यांची ही भूतदया प्रेरणादायी आहे.