spot_img
spot_img

राजगड मध्यप्रदेश चा बॅग लिफ्टिंग करणारा आरोपी गजाआड!

चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) राजगड मध्य प्रदेश येथील बॅग लिफ्टिंग करणारा आरोपी चिखली डीबी पथकाने गजाआड केला आहे.शुभमसिंह कुंदनसिंह सिसोदिया 22 कडियासासी, पाचोर,जिल्हा रायगड,मध्यप्रदेश असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार,चिखली पोलीस स्टेशन डिटेक्शन पथकाचे राजेंद्र काळे,अमोल
गवई,सागर कोल्हे, प्रशांत धंदर चिखली परीसरामध्ये पेट्रोलींग करीत अताना एसबीआय बँक चिखली येथे पाहणी करीत होते.दरम्यान एक इसम संशयास्पद दिसल्याने सदर इसमास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव शुभम सिंह कुंदनसिह सिसोदीया मध्य प्रदेश असे सांगितले त्याला चिखली येथे येण्याबाबत विचारपुस केली तेव्हा त्याने ‘मी कपडे विकण्या करीता आलेलो आहे.असे सांगितल्यावर वरुन त्याची पंचासमक्ष तपासणी केली असता त्याच्या जवळ एक सोन्या ची पोथ वजनी अंदाजे 3 तोळे किमंती अंदाजे 240000 रुपये मिळुन आली. याची कागदपत्रं त्याकडे नव्हते. दरम्यान या आरोपीवर अदखलपात्र गुन्हा क्र 110/25 कलम 124 म.पो.का प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच त्याची सखोल चौकशी केली असता तो नोव्हेंबर 2023 मध्ये सुध्दा चिखली येथे आला होता असे व त्याने त्याचे साथीदारासह AXIS बॅक चिखली समोरुन एक बॅग लिफ्टिंग केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपी यास अप क्र 796/23 कलम 379 भादवी अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळ असलेल्या बॅगमधुन 11200 रुपये जप्त करण्यात आले.

जप्त केलेला एकुण मुद्देमाल 251200 रुपयांचा आहे. पुढील तपास सफौ राजेंद्र काळे, पोकॉ सागर कोल्हे करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बि. बि. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली
ठाणेदार पो. नि. संग्राम पाटील, डि.बी. पथकाचे पोउपनि समाधान वडने, सफौ राजेंद्र काळे,पोना अमोल गवई, पंढरीनाथ मिसाळ, प्रशांत धंदर,सागर कोल्हे,मपोहेकॉ माया सोनोने, मपोकॉ रुपाली उगले यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!