spot_img
spot_img

💥EXCLUSIVE! आमदार सिद्धार्थ खरातांच्या हस्तक्षेपामुळे पेनटाकळीचा प्रश्न सुटला? – 2002 पासून रखडलेले पुनर्वसन, आता प्रत्यक्षात येणार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पेनटाकळी येथील ग्रामस्थ ३५ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होते.या मागणीसाठी ६ फेब्रुवारीपासून ग्रामस्थ पेनटाकळी धरणात उपोषणाला बसले.आज उपोषणाच्या आठव्या दिवशी आमदार सिद्धार्थ खरात यांनी ठिकाणी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा करून, दोन दिवसांत समस्या सोडवण्याची ग्वाही दिली.गावकऱ्यांसमोरच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने बैठक घेतली. बैठकीत उपविभागीय अधिकारी, नगर रचनाकार व अभियंते उपस्थित होते. २४९ ऐवजी ३८१ प्लॉट्सचा नवा आराखडा मंजूर करत, रस्ते आणि मोकळ्या जागांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२००२ साली पेनटाकळी प्रकल्प पूर्ण झाला, मात्र पुनर्वसन रखडले होते. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या ठाम भूमिकेमुळे प्रश्न मार्गी लागला. शिवसेना (उध्दव ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत, जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, व अन्य पदाधिकाऱ्यांचीही बैठकीत उपस्थिती होती

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!