बुलढाणा (हॅलो बुलडाणा) श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार प्र. विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडून आज स्विकारला. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांची आता खैर नाही,अशी चर्चा होत असून अनेकांचे धाबे दणाणलेत.
श्रीमती सिंघल ह्या यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या सचिव म्हणून राजभवन मुंबई येथे कार्यरत होत्या. त्या भारतीय प्रशासकीय सेवेतील 2009 च्या तुकडीच्या महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी आहेत.त्या कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना सोडत नाहीत. अगदी कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहेत. बुलढाणा जिल्ह्यात त्यांनी प्रशिक्षण काळात कर्तव्य निभावले.अनेकांना धडा शिकवला.आता त्या विभागीय आयुक्तपदी विराजमान झाल्या असून,त्यांचे लक्ष आता विभागावर राहणार आहे.