बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यावर आणि कामगार मंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यावर ॲड. आकाश फुंडकर यांच्यावर आणखी एक बुलढाणा जिल्हा संपर्क मंत्र्यांची जबाबदारी आली आहे.याबाबत प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी 5 फेब्रुवारीला नियुक्तीपत्र जारी करून शुभेच्छा दिल्या आहेत.
महायुती सरकारच्या निर्णयांना तळागाळात पोहोचवण्यासाठी व संघटनेच्या समन्वयासाठी जिल्हा संपर्क मंत्री म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे.कामगार मंत्रालय फार मोठे असून अभ्यासा नंतर मंत्रिपदाच्या कामकाजाला सुरुवात करेल. मंत्रिपदाला न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार असून कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत, बेरोजगारांना काम द्यायचे आहे, अशी भावना फुंडकर यांनी व्यक्त केली होती.आता त्यांना बुलढाणा संपर्क मंत्रीपदी नियुक्त करण्यात आले आहे.यापूर्वी ना.ॲड. आकाश फुंडकर जिल्हा संपर्क मंत्री बनतील अशी बातमी सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने प्रसारित केली होती हे विशेष!