देऊळघाट (हॅलो बुलडाणा) शेत जमीन बेकायदेशिर अकृषक करण्यात संबंधित विभागाचे ‘हात ओले’ असल्याचा आरोप एका निवेदनातून करण्यात आला आहे.
बुलढाणा शहरापासून 7 किलोमीटर अंतरावरील देऊळगाव हे मोठ्या वस्तीचे गाव असून, हायवेवर आहे. परिणामी गावातील शेतजमीनीचे भाव हे गगनाला भिडले आहेत.या गावातील काही शेतकरी शेतजमीनी बेकायदेशिरपणे अकृषक करून विक्री करीत आहेत.याबाबत बुलडाणा तहसील विभाग यांच्या कडून अकृषकाची परवानगी दिली जात आहे. वास्तविकता शेतजमीन ही अकृषक करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाची म्हणजेच नगर रचनाकार, पुनर्वसन भुसंपादन, बांधकाम विभाग,मराविवि कंपनी, आरोग्य विभाग, जीवन प्राधिकरण, पाटबंधारे विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, तलाठी अहवाल,भूमी अभिलेख विभाग यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतू बेकायदेशिर अकृषकाच्या परवानग्या दिल्या जात आहेत. शासनाकडे कोणत्याही प्रकारचे विकास शुल्क जमा केले जात नाही. दरम्यान या प्रकरणी एक अधिकारी व संबधित शेतकऱ्यात आर्थिक हितसंबंध जोपासल्या जात आहेत. यामुळे शासनाचा महसूल सुद्धा बुडत आहे. त्यामळे देऊळघाट येथील अकृषकाच्या परवानग्या ह्या नियमाप्रमाणे देण्यात याव्यात व देण्यात आलेल्या अकृषकाच्या परवानगी बाबत सखोल चौकशी करण्यात यावी तसेच 15 दिवसाच्या आत संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी,अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना अलीम खान खालील खान,इम्रान खान इस्माईल खान राहणार देऊळघाट यांनी दिले आहे.