spot_img
spot_img

हा कोणता फोटोग्राफर? – अश्लील फोटो काढले..म्हणे भावाला मारणार!

हिवरखेड (हॅलो बुलडाणा) फोटो काढ नाहीतर जीवाने मारील अशी धमकी देणाऱ्या आरोपी विजय संजय सोनटक्के याला पोलिसांनी अटक केली.प्रकरण असे आहे की, पो स्टे हिवरखेड अंतर्गत कायमी फौजदारी प्रकरण क्रमांक 14/2025 कलम 64(2) (m),74,75,76,77, 356(3), 351(2) (3) भारतीय न्याय संहीता सहकलम 04 बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 सहकलम 66 (ई), 67 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी विजय संजय सोनटक्के याने आपल्या राहत्या घरात पिडीतेवर लैंगिक अत्याचार केला.
हकिकत अश्या प्रकारे आहे की, यातील पिडीता हिला आरोपी याने फिर्यादीच्या सन 2020 मध्ये आठव्या वर्गामध्ये शिक्षण घेत असतांना एका दिवशी पीडीता ही गोठयावर जात असतांना आरोपी याने तिच्यासोबत फोटो काढ नाहीतर तुझ्या लहाण भावाला मारुन टाकेल अशी धमकी देवुन फिर्यादीसोबत फोटो काढले व तिचा मोबाईल नंबर घेतला. दरम्यान आरोपी धमक्या देत म्हणाला की,तुझे फोटो माझेजवळ आहेत माझे घरी भेटायला ये नाहीतर फोटो व्हायरल करेल व तुझी बदनामी करेल. त्यामुळे बदनामीपोटी पिडीताचे इच्छेविरुध्द आरोपीने अॅन्ड्राईड मोबाईल मध्ये अर्धनग्न अवस्थेत फोटो काढुन पीडीतेचा बळजबरीने शारीरीक प्रस्तापीत केले. त्यानंतर त्याचे मोबाईल मध्ये काढलेले अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देवुन सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवत होता. व पिडीतेला आरोपी हा माझे सोबत लग्न कर नाहीतर तुझी अश्लिल फोटो व्हायरल करेल अश्या धमक्या देत होता. त्यास फोटो डिलीट कर व्हायरल करु नको, असे म्हणुन लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला होता. दरम्यान पिडीतेचे लग्न ठरले असता, आरोपी याने पिडितेच्या होणा-या नव-याला अश्लील फोटो पाठवून बदनामी केली अशी तक्रार दाखल झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!