मेहकर (हॅलो बुलडाणा) शेत जमिनीचा 30 लाख रुपयांत सौदा झाला.. पहिले 8 लाख रुपये दिले..परंतु उर्वरित रक्कम अडचणीमुळे देता आले नाही म्हणून आरोपींनी संगणमत करून सासू ,मुलगा, पुतण्या यांना जबरदस्तीने पुण्यातील एका खोलीत कोंडून ठेवून मारहाण केली.. शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिली,अशी तक्रार आता मेहकर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
प्रकरण असे आहे की,आरोपी गजानन कडूजी मापारी,संगीता गजानन मापारी,भगवान मापारी,सौ पुष्पा भगवान मापारी, गीता मापारी आणि गीता मापारी ची बहिण राहणार धायफळ व ईरटीका गाडीचा चालक तालुका लोणार हल्ली मुक्काम तळेगाव दाभाडे पुणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी छाया गजानन सानप यांचा दीर व आरोपी गजानन कडूजी मापारी याचा धायफळ येथील शेत जमिनीचा 30 लाख रूपात सौदा झाला होता.परंतु गजानन मापारीने केवळ 8 लाख रुपये फिर्यादीच्या दिराने दिलेले असून बाकी रक्कम देणे आहे.दरम्यान संगणमत करून सासू ,मुलगा, पुतण्या त्यांना जबरदस्तीने कार मधून पुणे येथे न्यू एका खोलीत कोंडले.त्यांना मारहाण करण्यात आली आणि शिव वेळा करून जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली,अशी फिर्याद पोलिसांना देण्यात आली आहे.या आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










