spot_img
spot_img

बुलढाण्यात रंगणार पोलिसांचा महाकुंभ! ३७ व्या अमरावती परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खाकी वर्दीतील खेळाडू आता मैदान गाजवणार आहेत. अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा–२०२६ चे आयोजन करण्याचा मान यंदा बुलढाणा जिल्हा पोलिसांना मिळाला असून दि. २३ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात या स्पर्धा पार पडणार आहेत.

अमरावती परिक्षेत्रातील एकूण ०६ घटक या स्पर्धेत सहभागी होत आहेत.यामध्ये यजमान बुलढाणा पोलीस,यवतमाळ,वाशिम,अकोला, अमरावती ग्रामीण, अमरावती शहर (पोलीस आयुक्तालय) या सर्व घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. एकूण सुमारे १,०९१ खेळाडू आपलं कसब दाखवणार आहेत. एकूण १७ प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. ॲथलेटिक्स (पुरुष/महिला),बॉक्सिंग, कुस्ती, ज्युडो , तायक्वांदो, वुशू , वेटलिफ्टिंग, पावरलिफ्टिंग, हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल (महिला/पुरुष), हँड बॉल, खो-खो (पुरुष/महिला), कबड्डी (पुरुष/महिला), व्हॉलीबॉल (पुरुष/महिला), क्रॉस कंट्री (पुरुष/महिला १० कि.मी.), जलतरण या खेळांचा समावेश स्पर्धेमध्ये आहे.
बुलढाणा शहरातील पोलीस कवायत मैदान, जिल्हा क्रिडा संकुल, सहकार विद्या मंदिर, जिजामाता प्रेक्षागार मैदान तसेच जलतरण स्पर्धा खामगाव येथील जी.एस. कॉलेज येथे होणार आहे. जिल्हा पोलीस दलाकडून स्पर्धेच्या निमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली आहे. वर्दीच्या कर्तव्यासोबतच मैदानावरही दमखम दाखवणाऱ्या या खेळाडूंचा उत्साह पाहण्यासाठी बुलढाणेकरांनी मोठी गर्दी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

▪️नेतृत्व कोणाचं?
विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक बुलढाणा निलेश तांबे यांच्या नेतृत्वात अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, खामगाव पियुष जगताप तसेच बुलढाणा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार स्पर्धा यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!