बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्वच्छतेच्या सवयी अंगीकारुन ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन 2023-24 या वर्षाचे पुरस्कार प्रमाणपत्र उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर करण्यात आले आहेत.या स्पर्धेत बुलढाणा तालुक्यातील ग्रामपंचायत सावळी प्रथम मानकरी ठरली तर द्वितीय स्थानी सव ही ग्रामपंचायत आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन 2023-24 या वर्षाचे पुरस्कार घोषित करण्यात आले असून उद्या प्रजासत्ताक दिनी ते सन्मानपूर्वक विस्तारित करण्यात येणार आहे.या पुरस्कारांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रथम पुरस्कार बुलढाणा तालुक्यातील सावळी ग्रामपंचायत ने पटकावला आहे.तर हाच द्वितीय पुरस्कार सर्व ग्रामपंचायतला मिळाला आहे. हाच तिसरा पुरस्कार मेहकर तालुक्यातील पांगरखेड ग्रामपंचायतला प्राप्त झाला. शिवाय स्वर्गीय वसंतराव नाईक विशेष पुरस्कार देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी ग्रामपंचायत ला देण्यात येणार आहे.स्वर्गीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार नांदुरा तालुक्यातील कोकलवाडी ग्रामपंचायतला प्राप्त झाला असून,स्वर्गीय आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार बुलढाणा तालुक्यातील ग्रामपंचायत माळवंडीला प्राप्त झाला आहे.या ग्रामपंचायतींना उद्या ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.