मोताळा/दाभाडी (हॅलो बुलडाणा) आज मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील डॉक्टर टेकाळे दांपत्यावर आज १८ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या दरोड्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. गुन्हेगारांनी घरात घुसून सोनं, चांदी, रोख रक्कम लुटली आणि डॉक्टरांच्या पत्नी डॉ. माधुरी टेकाळे यांचा गळा दाबून खून केला. डॉ. गजानन टेकाळे गंभीर जखमी असून त्यांना जळगावमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
घटनास्थळी पोहोचलेले धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी तात्काळ पोलिस प्रशासनाला आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. पोलीस प्रशासनाने त्वरित तीन वेगवेगळ्या टीम्स पाठवून शोध मोहीम सुरू केली आहे. गायकवाड यांच्यासोबत बोराखडीचे ठाणेदार सारंग नवलकर आणि स्थानिक ग्रामस्थ, शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आता प्रश्न आहे, या भयावह घटनेच्या आरोपींना कधी पकडले जाईल आणि नागरिकांची सुरक्षा कधी सुनिश्चित केली जाईल?