मोताळा (हॅलो बुलडाणा) जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमधील ठेवलेल्या किर्लोस्कर कंपनीच्या जनरेटर ची बॅटरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांचे धाडस एवढे वाढले की न्यायालयात देखील चोरी करण्यासाठी ते मागेपुढे पाहत नाहीत..तेव्हा सर्व सामान्यांच्यामालमत्तेचे काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
जनरेटरची बॅटरी चोरी झाल्याच्या घटनेची तक्रार धामनगाव बडे येथे राहणाऱ्या शिपाई भूषण श्यामकांत चोपडे यांनी पोलिसांना दिली आहे.शिपाई चोपडे यांनी तक्रार दिली की, जिल्हा न्यायालयातील मागील बाजुस ठेवलेले किर्लोस्कर कंपनीचे जनरेटर बंद करुन मी घरी निघुन गेलो तेव्हा जनरेटर व जनरेटरची 88 ॲम्पपिअरची बॅटरी सुव्यवस्थितीत होती.नंतर जिल्हा न्यायालयाला 28 व 29 डिसेंबर रोजी सुट्टी होती. ते 30 डिसेंबर रोजी सकाळी ड्युटीवर आलो असताना, कोर्टाचे कामकाज सुरु असतांना साडेचार वाजता लाईट गेल्याने जिल्हा न्यायालयातील जुन्या इमारती मागील ठेवलेले किर्लोस्कर कंपनीचे जनरेटर सुरु करण्या करीता गेलो असता जनरेटरला असलेली 88 अँम्पपिअरची बॅटरी दिसुन आली नाही. या बॅटरीची किंमत 6000 रुपये असून अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. अशी तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान चोरट्यांची हिम्मत न्यायालयापर्यंत गेली असून, पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.