बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात (उबाठा) शिवसेनेच्या नेतृत्वाला मोठा हादरा बसला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी विश्वास टाकून नरेंद्र खेडेकरांना बुलढाणा लोकसभेची उमेदवारी दिली होती. खेडेकरांना 3,20,388 मते मिळाली होती, मात्र विजयाची संधी हुकली होती. विधानसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेला जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही. फक्त उबाटा मतदारसंघातून एकच जागा निवडून आली.
आता या एकमेव गटालाही मोठा धक्का बसला आहे. चिखलीचे रहिवासी व शिवसेना (उबाटा गट) उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी खासदार प्रतापराव जाधवांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दुसऱ्या शिवसेनेत उडी घेतली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.
जिल्ह्यातील पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याच्या चर्चा सुरू असून, शिवसेनेतील अंतर्गत फूट चव्हाट्यावर येत आहे. कपिल खेडेकरांच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
उड्डाण घेतलेल्या “शिवबंधन” नाट्यावर हा नवीन वळण ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.