बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कपावर जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे.ही बातमी सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने प्रकाशित केली असून,जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात याचा जागर होत आहे.हॉटेल्स आणि चहा सेंटरवर ‘बातमीच्या कटिंग’ दिसून पडतात. हीच ‘हॅलो बुलढाणा’ची विशेषता आहे!
कॅन्सर सारख्या आजारांना चहाचे कागदी कप कारणीभूत ठरतात. त्यामुळे या कपांवर त्वरित बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहे.चहा शौकीनांसाठी तर ही धोक्याची घंटा आहे, एखाद्या कॅफे असो अथवा कोणताही चहाचा स्टॉल, टपरी अशा बऱ्याच ठिकाणी पेपर नाहीतर प्लास्टिक कपांचा वापर केला जातो.दरम्यान बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कपावर त्वरित बंदी घालण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना निर्गमित केले आहे. या संदर्भातील लोकहिताच्या दृष्टीने ‘हॅलो बुलढाणा’ ने सर्वप्रथम योग्य ती बातमी प्रसारित करून जागर केला.आता या बातमीचे ठिकठिकाणी कटिंग केलेले पोस्टर झळकत आहेत.नागरिकांनी कागदी कपात चहा पिण्याची मानसिकता बदलावी आणि आरोग्य जपावे,एवढेच आवाहन पुन्हा ‘हॅलो बुलढाणा’ करीत आहे.











