बुलढाणा (हॅलो बुलडाणा/प्रशांत खंडारे ) आपण ब्रेकिंग न्यूज कव्हर करत असता, पण आज ब्रेक घ्या! आजच्या दिवशी ब्रेकिंग न्यूज ची काळजी सोडून थोडं रिलॅक्स व्हा! आजचा दिवस आपणासाठी खास आहे. बातम्यांवर किती लक्ष द्याल ?आज तरी वाढदिवसाच्या केकवर लक्ष केंद्रित करा कारण ‘हॅपी बर्थडे’ पेक्षा अधिक आदर आज आपल्याला मिळायला हवा! आपली न थांबणारी समर्पण भावना,धाडस आणि सत्य शोधण्यात घालवलेले असंख्य तास आपली ओळख वृध्दांगीत करतेय! याचा अभिमान अनेकांना आहे. आपल्या तीक्ष्ण लेखणीने व निर्भीड पत्रकारितेने अत्यंत अल्पवधीत अन्यायाविरुद्ध वाचा फोडून आपण सामान्यांच्या मनात घर केलेय आणि आपण जनतेचा बुलंद आवाज झालात. त्यामुळेच की काय आपल्याला पत्रकारितेतील ‘वस्ताद’ म्हणून ओळखले जातेय.
लोकशाहीचा चौथा खांब म्हणून, समाजातील सर्व घटकांचे प्रश्न राजकीय व्यवस्थेसमोर मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असले पाहिजे, या उद्देशाने
“खींचो न कमानों को न तलवार निकालो..
जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो”
या ध्येयाने प्रेरित होऊन आपण आधीच ‘सिटी न्यूज’ वृत्तवाहिनी व नंतर दैनिक ‘जनसंचलन’ हे वृत्तपत्र काढले. आणि समाजाला दिशा देण्याचे व अन्यायविरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य सुरु झाले. यावरही कळस म्हणजे सकारात्मक गोष्टींना लोकांसमोर आणण्याचं आणि अपप्रवृत्तींना ठेचण्याचं काम आपण सुरू केलेल्या ‘हॅलो बुलढाणा’ वेब पोर्टलच्या माध्यमातून होतेय! अल्पावधीतच आठ लाख वाचकांचा टप्पा पार करणारे ‘हॅलो बुलढाणा’ सेकंदा सेकंदातील घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवीत असल्याने आपल्या सामाजिकतेचे भान आणि कर्तव्याची जाण आणि राजकीय परिवर्तनासाठी धडपडणाऱ्या आपल्या नेतृत्वाला झळाळी देताहे! सन्माननिय,
जितु भाऊ..
आपला आज वाढदिवस ! आपल्या कार्यकर्तृत्वाला सॅल्यूट व त्रिवार शुभेच्छा!