मेहकर (हॅलो बुलडाणा) ‘पुष्पा टू’ चित्रपट रिलीज झाला आणि त्याची चर्चाही देशभरात होत आहे. ‘पुष्पा मतलब ब्रँड!’ ही डायलॉग गाजत असून,बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरातही नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नावासह विकासाची चर्चा जोरदार आहे. त्यांना मिळाले आमदार पदाचा बॅच आणि ओळखपत्र त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ चरणी अर्पण करून विकास कामे करण्याची शपथ घेतली आहे.दरम्यान समर्थकांनी ‘सिद्धार्थ खरात मतलब विकासाचा ब्रँड!’ होणार असल्याची घोषणा दिली आहे.
गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर मेहकर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभा कडून मिळालेल्या आमदार पदाचा बॅच व ओळखपत्र सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरणी अर्पण करून अभिवादन केले. मुंबईवरून 11 डिसेंबर रोजी खरात शहरात पोहोचले. खरात मेहकरचेच आमदार नसून सिंदखेडराजा ही त्यांच्या मतदारसंघाचा भाग आहे. खरात मातृतिर्थ सिंदखेडराजातील राजवाडा येथे पोहोचले आणि एकच जल्लोष झाला.दरम्यान त्यांच्या विकास कामाबाबत शिवाजीराजे जाधव यांनी विकासाची शाश्वती दिली. शिवाजीराजे जाधव म्हणाले की,सिद्धार्थ खरात यांच्या प्रयत्नातून विकास कामांना नवा वलय प्राप्त होईल!