बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने बुलडाणा येथे, आज १० डिसेंबरला आक्रोश न्याय मोर्चा आयोजित करण्यात आला. थोड्याच वेळात म्हणजे दोन वाजता हा मोर्चा निघणार आहे.दरम्यान पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असून,हिंदू बांधव मोर्चा सहभागी होत आहेत.
बांगलादेशाच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध त्यांचा निषेध नोंदविण्यासाठी
या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक,चिखली अर्बन चे अध्यक्ष सतीश गुप्त व हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख विजय पवार आदींनी केले आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत. दररोज बलात्कार, खून, लुटमार, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या घटना निंदनीय असून मानवजातीला काळीमा फासणाऱ्या आहेत. केवळ हिंदू आहेत म्हणून हा अत्याचार होत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असून या घटनेचा निषेध नोंदणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने बुलडाणा येथे आयोजित आक्रोश मोर्चात हिंदू बांधव गर्दे वाचनालय येथे एकत्रित होत आहेत.