बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी म्हणून अनोखा विक्रम प्रस्थापित करणारे मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्यासाठी काही अधिकारी नालायकपणाचा कळस गाठत आहेत. टेकाळेंचा भ्रष्टाचार तसा उघड तर झालाच आहे, परंतु तो सूर्यप्रकाशात आणून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी दैनिक जनसंचलन – सिटी न्यूज सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र, या प्रयत्नांना खोडा घालण्याचे काम महसूल विभागातील काही अधिकारी करीत आहेत. नेमका तो अधिकारी कोण आणि कशाप्रकारे तो महाभ्रष्टाचारी टेकाळे यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, हे या भागात आम्ही उघडपणे वाचकांसमोर आणत आहोत. सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनच्या वाचकांना हे चांगल्याप्रकारे ज्ञात आहे की, महाभ्रष्टाचारी टेकाळे यांनी महसूल विभागात राहून जो काही गैरकारभार आणि भ्रष्टाचार केलेला आहे, त्याचा सर्वांत आधी भंडाफोड आम्हीच केला होता. टेकाळे यांनी अत्यंत नालायकपणाचा कळस गाठत आणि अंगावर बेशरमपणाची झूल पांघरत महसूल विभागाला पोखरण्याचे काम केले आहे. वर्षानुवर्षे टेकाळे अक्षरशः वाळवीसारखे महसूल विभागाला पोखरण्याचे काम करीत आहेत. दैनिक जनसंचलनने यासंदर्भात अगदी पुराव्यांनिशी सर्व भ्रष्टाचार जनतेसमोर आणला आहे. मात्र, महसूल विभागातील अधिकारी आजही टेकाळेंच्या गैरव्यवहारांकडे व भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करीत आहेत, तसेच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे वरिष्ठ स्तरापर्यंत दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने पोहोचवण्याचे काम केलेले आहे. एव्हढेच नव्हे तर टेकाळे यांनी जो काही बेबंद भ्रष्टाचार केला, त्यातून जी काही चला अचल संपत्ती कमावली, त्याचे सगळे पुरावे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सुपूर्त करण्यात आली होती. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टेकाळे यांच्या अवैध आणि बेनामी संपत्तीसंदर्भात बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासह पत्रव्यवहार केला होता. या पत्रव्यवहारानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने महसूल विभागाला पत्र पाठवले होते. या संपूर्ण पत्रांच्या प्रतींची मागणी सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नक्कल विभागाकडे करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यासाठी लागणारे शुल्क देखील दैनिक जनसंचलनच्या वतीने भरण्यात आले होते. मात्र, यानंतरही तलाठी आस्थापन विभागातील अव्वल कारकून धनवटे यंनी ही माहिती देण्यास चक्क नकार दिलेला आहे. खरे तर ही माहिती देण्यास नकार देण्याचा मुजोरपणा धनवटे यांनी करण्याची काहीही गरज नव्हती. त्यांनी नियमानुसार ही माहिती देणे गरजेचे होते. मात्र, या टाळाटाळीमागे नक्कीच टेकाळे यांच्याशी त्यांचे लागेबांधे असण्याची शक्यता आहे किंवा त्यांना टेकाळे यांची भीती वाटत असावी. कारण त्याशिवाय अशाप्रकारे नियम डावलून माहिती देण्यास टाळाटाळ करण्याचा अधिकार धनवटे यांना अजिबात नाही. धनवटे यांच्या या मुजोरीला महसूल विभागातील इतर अधिकारी देखील जबाबदार आहेत. त्याचाही खुलासा दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज लवकरच करणार आहे.दरम्यान, धनवटे यांच्यासह महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या या नालायकपणाच्या विरोधात आता सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनच्या वतीने विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्याकडे तक्रार केली असून, महसूल विभागातील अधिकारी कशाप्रकारे बेकायदेशीर कृत्य करीत आहेत, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे.
हा संपूर्ण प्रकार हेच दर्शवतो की, महसूल विभागात कशाप्रकारे संगनमताने भ्रष्टाचार होतो आहे. अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला भ्रष्टाचारातून वाचवण्यासाठी सहकार्य करतो आहे. या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असे न झाल्यास महसूल विभागात भविष्यात भ्रष्टाचार वाढतच जाईल. त्यात टेकाळे यांच्यासारखे बेशरम, नालायक, महाभ्रष्टाचारी अधिकारी आणखी भरच घालत राहतील. यातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मात्र वाढणार आहेत. जिल्ह्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
▪️दत्तात्रयांच्या पाठी भ्रष्टाचारी!
गुरुदत्तांच्या पाठीशी सत्य आणि श्रद्धा असणाऱ्यांसाठी न्याय असतो. परंतु महा भ्रष्टाचारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घातल्या जातेय.”जो कोणी” पांघरून घालण्याचा प्रयत्न करेल त्याचा आम्ही खोलवर जाऊन नियमबाह्य केलेल्या कामाचा उलगडा करून “सत्य काय” ते बातमीपत्रातून प्रसारित करून ‘त्या” दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत आमचा हा लढा असा सुरू राहणार!
क्रमशा :