मेहकर (हॅलो बुलडाणा) मेहकर लोणार मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी व मित्रपक्ष शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या उमेदवार डॉक्टर ऋतुजा ऋशांक चव्हाण यांच्या प्रचार दौरा व विधानसभा संघटनेच्या एकंदरीत ताफ्यामुळे मेहकर लोणार मतदार संघात यंदा परिवर्तन अटळ आहे असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज असून डॉक्टर ऋतुजा चव्हाण ह्या विजयी होतील असाही अनुमान लावला जात आहे. गाव, शहर ते संपूर्ण मतदार संघ पालथा घालत ऋतुजाताईंनी जनसामान्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या प्रत्येक प्रचार सभेला, दौऱ्याला जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे. ठीकठिकाणी त्यांच स्वागतही होतं आहे.
दिनांक 16 नोव्हेंबर त्यांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांची तुफान सभा पार पडली. अलोट गर्दीने जनसामान्यांनी सुजात आंबेडकर यांना प्रतिसाद दिला. सुजात आंबेडकर यांनी डोणगाव येथील वादळी सभेत ” सोयाबीन,कपाशीचे गडगडलेले भाव व डोणगाव शहराची भकास झालेली अवस्था जर बदलायची असेल तसेच परंपरागत पक्षांना मात द्यायची असेल तर अभ्यासू, उच्च शिक्षित, तळमळीचे उमेदवार विधानसभेत पाठवायला हवे त्यामुळे ऋतुजा ताई चव्हाण या सर्वोतपरी सक्षम पर्याय आहे. परिवर्तनासाठी, विकासासाठी ऋतुजाताईंना निवडणूक द्या असें प्रतिपादन त्यांनी केले.










