spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! नाथाभाऊ गरजले.. ‘महायुतीने लाडक्या बहिणीचे मंगळसुत्रही महाग केले! -जयश्रीताई म्हणाल्या … मशालीच्या आगीत गद्दार भस्मसात होऊन परिवर्तन होणार !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लाडकी बहीण योजना निवडणुक जिंकण्याचा फंड आहे.राज्य सरकारने केवळ मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून आया बहिणींच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमोडून टाकले. निर्दयी सरकारने सोन्याच्या किंमतीत अवाजवी वाढ करून सर्वसामान्य महिलांचे (बहिणीचे)

मंगळसूत्र देखील महाग केले असे प्रतिपादन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.दरम्यान मशालीच्या आगीत शिंदे गटाच्या गद्दारांना भस्मसात करून परिवर्तन होणार असल्याची शाश्वती जयश्रीताई शेळके यांनी दिली.

मोताळा परिसराचा विकास ठप्प झाला आहे. एमआयडीसीचा प्रश्नही रेंगाळत पडला आहे. बुलढाणा मतदार संघाला विकासाभिमुख, सुसंस्कृत आणि शिक्षित चेहरा हवा आहे. यासाठी जयश्रीताई शेळके यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज केले. तर लेवा पाटीदार समाज हा सुज्ञ समाज आहे. योग्य वेळी योग्यच निर्णय घेतो. यावेळी हा समाज गुंडगिरी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेलअसेही खडसे म्हणाले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गट तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ एकनाथ खडसे यांची जाहीर सभा मोताळा येथे पार पडली. यावेळी खडसे यांनी महायुती सरकार, त्यांचे धोरण आणि कार्यपद्धती यावर टीकेची झोड उठविली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत,माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, धृपदराव सावळे, आमदार धीरज लिंगाडे, आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना खडसे म्हणाले,विचार न करता आणि राज्याच्या तिजोरीची वास्तविकता लक्षात न घेता महायुती सरकारने विकासाच्या नावावर पैश्यांची भरमसाठ उधळपट्टी केली. परिणामी राज्य सरकार अक्षरशः दिवाळखोरीच्या गर्तेत सापडले आहे.राज्यावर 8 लाख कोटी रुपयांचे महाकर्ज झाल्याचा घणाघाती आरोप खडसे यांनी केला. सारासार विचार न करता राज्य सरकार वारेमाप खर्च करत राहिले, कोणत्याही योजनेला मंजुरी देत राहिले. यामुळे राज्याची तिजोरी खाली झाली असून राज्याची अवस्था दिवाळखोर सारखी झाली आहे.राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले असून विविध देणे व चुकवणे देता येत नाही अशी भीषण आर्थिक अवस्था झाली आहे.संजय गांधी निराधार सारख्या योजनेतील लाभार्थ्यांची रक्कम वेळेवर मिळत नसून ठिबक योजनेसारख्या अनेक योजनांचे अनुदान, शेतकऱ्यांची मदत रखडली आहे.

▪️पन्नास रुपयांच्या साड्या गोधडीच्याही लायकीच्या नाही!

विकास कामे करणाऱ्या राज्यातील कंत्राटदारांची देयके थकीत
आहेत. अडीच वर्षांत काहीच केले नाही, म्हणून आधी केलेल्या सर्वच विधानसभा विषयक सर्वेक्षणाचे अहवाल विरोधात आले, महायुती सरकार जाणार आणि महाविकास आघाडी सरकार येणार असा अहवालाचा नित्कर्ष निघाला. यामुळे घाबर गुंडी उडालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. अडीच वर्षांत गोर गरीब बहीण आठवली नाही, मग विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच कशी बहीण लाडकी झाली? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.याचे उत्तर म्हणजे केवळ त्यांच्या मतांसाठी हे होय. दीड हजार घ्या, भांडी घ्या पण बहिणींनो आम्हाला मतदान करा असा यामागील कावा आहे. मध्यंतरी ५० रुपयांच्या साड्या वाटल्या, त्या इतक्या नित्कृष्ट दर्जाच्या की त्या गोधडी ला शिवायच्या पण कामाच्या नाही. यातही घोळ आलाच. हे सरकारच मुळात भ्रष्टाचाराच्या पायावर उभे आहे. राज्याची अस्मिता असलेल्या शिवरायांच्या पुतळ्यात देखील यांनी भ्रष्टाचार केला.अवघ्या काही महिन्यांत मालवण येथील छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्र ची मान देशासमोर शरमेने झुकली असे खडसे म्हणाले.

▪️कापसाचे भाव पाडण्यासाठी गाठी आयात केल्या!

लाडकी बहीण जाहीर झाल्यावर लगेच गोडे तेल, रवा ,खोबरे, जिरे, मिरे, तूप आदींचे भाव भरमसाठ वाढले. आया बहीणींची दिवाळी यांनी नासविली.जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱयांच्या आत्महत्त्या साठी केंद्र व राज्य सरकारची चुकीची धोरणे जवाबदार आहे. शेतकऱ्यांचा कापूस हाताशी येत असताना त्यांनी २२ लाख कापसाच्या गाठी आयात केल्या. त्यामुळे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव, सिंचनाची सोय नाही, जीवनावश्यक वस्तूंचे भाव आणि महागाई गगनाला भिडले. अजूनही शेतकरी कोणताही सौदा कापूस , सोयाबीन विकण्याच्या मदतीवर करतात, लग्नकार्य ही हंगामा नंतर करण्यात येतात. मात्र मालाला कवडीमोल भाव मिळाला,लग्नाला दागिने करावे तर पाऊण लाखावर भाव.त्यामुळे या दळभद्री सरकारने गरिबांसाठी मंगळसुत्रही महाग करून टाकले असा घणाघात करून त्यांनी सरकारचे वाभाडे काढले.
▪️गृहमंत्र्यालाच धोका ,मग कायदा सुव्यवस्था चे काय?
राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. स्त्री अत्याचार, गुन्हेगारी वाढत आहे . मुक्ताईनगर मध्ये एका उमेदवारांवर दिवसा गोळीबार करण्यात आला. गृहमंत्री फडणवीस यांना धोका आहे म्हणून त्यांना झेंडा प्लस सुरक्षा देण्यात आली.गृहमंत्री च असुरक्षित तर सामन्यांचे काय? असा सवाल खडसे यांनी यावेळी केला.

▪️लेवा पाटीदार हा तर सुज्ञ समाज, तो योग्य निर्णय घेतो -जयश्रीताई शेळके

लेवा पाटीदार समाज हा शांत संयमी सुसंस्कृत समाज आहे. हा समाज सुज्ञपणे निर्णय घेतो. नाथाभाऊ यांच्या शब्दाला या मतदारसंघांमध्ये मोठा मान आहे. तुमच्या शब्दाकडेच मतदारांचे लक्ष असते. आज भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत हे बळ देणारे आहे. बुलढाणा मतदारसंघामध्ये लोकशाही विरुद्ध हुकूमशाही, लोकशाही विरुद्ध गुंडाराज अशी लढाई आहे. त्यामुळे आपण लोकशाहीच्या बाजूने उभे राहून गुंडगिरीला बाहेरचा रस्ता दाखवा.बुलढाणा मतदार संघामध्ये विकास झालाच नाही, सौंदर्यकरण करून ,त्यालाच विकास म्हटले जातय. त्याचाच ढोल पिटला जातोय, मात्र मोताळा एमआयडीसीचा प्रश्न जसा आहे तसाच आहे. मोताळा आणि मोताळा परिसराचा विकास का झाला नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या कामाची चोरी देखील करण्यात आली आहे.जिल्हा परिषद सदस्यांनी केलेले कामे सुद्धा आपल्या नावावर, बोर्डावर लिहिण्याचे प्रकार झाले आहे. त्यामुळे बुलढाणा मतदारसंघात झालेला विकास हा वांजोटा विकास असल्याचे ताई म्हणाल्या.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आहे. या परिवर्तनाच्या लाटेत,या परिवर्तनाच्या आगीत मशाल पेटवून गद्दारांना गाडायचे आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!