चिखली (हॅलो बुलडाणा) शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी चिखली येथील अंकुशराव पडघान यांनी अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी संबंधित आरोपीला तात्काळ अटक करण्यात येऊन भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन शिवसेना उ.बा.ठा.गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
दि. १५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे चिखली विधानसभा मतदार संघातील जनता पक्षाच्या उमेदवार याच्या कुटुंबिक प्रतिनिधी अंकुशराव पडघान यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट हाॅटस् अॅप च्या विविध गृप मध्ये टाकली आहे. सदर पोस्टमुळे सामाजिक व राजकीय वातावरण दुषीत होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात येऊन भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे. असे सदर निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर, तालुका प्रमुख किसनराव धोंडगे, शहर प्रमुख श्रीराम झोरे, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, युवा सेना तालुका प्रमुख गजानन पवार, शिवसेना शहर संघटक प्रीतम गैची, युवासेना शहर प्रमुख प्रितम गैची, तालुका संघटक विष्णू मुरकुटे, विजय सोळंकी, सतनामसिंग वधवा, राहुल वरवंडे, राम चिंचोले, सोहेल शाह, शंभू गाडेकर, रवी पेटकर, बंडू नेमाने, समाधान जाधव, शाखा प्रमुख संजय कदम, प्रल्हाद वाघ, सुनील रगड, ग्रा. पं. सदस्य रुपराव ठेंग, गजानन पवार, अनिल देशमुख, आकाश माळोदे, बंडू सुरुशे, किशोर डहाळे, अण्णा देवकर याच्या स्वाक्षऱ्या आहेत.










